तरुणीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते मनोज कर्जगी यांना अटक

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथे एका २० वर्षीय तरुणीचे चुंबन घेण्याचा आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे ५४ वर्षीय नेते मनोज कर्जगी यांना पोलिसांनी अटक केली आहे.  ही तरुणी एका केशकर्तनालयात काम करते. कर्जगी या केशकर्तनालयात गेले असता ही घटना घडली. या तरुणीने तिच्या मित्राला याविषयी माहिती दिल्यानंतर तो त्याच्या दोन मित्रांना घेऊन तेथे आला आणि त्यांनी कर्जगी यांना चोपले. यानंतर पोलिसांत तक्रार केल्यानंतर कर्जगी यांना अटक करण्यात आली. कर्जगी यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले.

संपादकीय भूमिका

गांधीवादी काँग्रेसी नेत्यांची विकृत मानसिकता !