रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्या धर्मप्रेमींचे अभिप्राय

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतर जग कसे असेल ?’, त्याचे प्रतिरूप म्हणजे हा आश्रम आहे !

‘आश्रम पुष्कळ सुंदर, सुव्यवस्थित आणि सुनियोजित आहे. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतर जग कसे असेल ?’, त्याचे प्रतिरूप म्हणजे हा आश्रम आहे. मला येथे प्रसन्नता जाणवली. साधकांचे आचरण पुष्कळ शुद्ध आहे.’ – रामप्रियाश्रीजी, कथा प्रवक्ता रामप्रिया फाउंडेशन अमर वक्ती, अमरावती, महाराष्ट्र. (१३.६.२०२२)

२. आश्रम पहातांना नामजप करण्याचा प्रयत्न केल्यावर मला स्वर्गीय अनुभूती आली !

‘वर्ष २०१९ मध्ये मला  आश्रम पहाण्याचे सौभाग्य मिळाले. त्या वेळी मी नामजप आरंभ केला होता. तेव्हा माझे अनुभव सर्वसाधारण होते; परंतु आज आश्रम पहातांना मी नामजप करण्याचा प्रयत्न केला आणि मला स्वर्गीय अनुभूती आली.’

– विश्व ज्योती नाथ, होजाई, आसाम. (१३.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक