परभणी येथील ‘आकाशकन्या कल्पना चावला’ शाळेच्या संचालिका सौ. ठाकरे यांनी सनातन संस्थेची ग्रंथसंपदा पाहून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले महान असणार !’, असे गौरवोद्गार काढणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘परभणी (महाराष्ट्र) येथील ‘आकाशकन्या कल्पना चावला’ शाळेच्या संचालिका सौ. ठाकरे सनातनच्या ग्रंथसंपदेची सूची पहात असतांना त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पुष्कळ वेळ पहात होत्या. नंतर त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) मुखावर किती चैतन्य जाणवत आहे. ‘वेगवेगळ्या विषयांवरील एवढे ग्रंथ सिद्ध करणे’, हे सामान्य व्यक्तीचे कार्य नाही. ते महान असणार !’’

– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (२९.१.२०२२)