कर्ज देणार्‍या चिनी ॲपच्या प्रकरणी ‘ईडी’ने ‘पेटीएम्’, ‘इझीबझ’ आदींचे ४६ कोटी ६७ लाख रुपये गोठवले

नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) त्वरित कर्ज देणार्‍या चिनी ॲपच्या प्रकरणी ‘पेटीएम्’, ‘रेझरपे’, ‘कॅशफ्री’ आणि ‘इझीबझ’ यांच्या माध्यमातून ठेवलेल्या व्यापारी खात्यांमधील ४६ कोटी ६७ लाख रुपये गोठवले आहेत. दुसरीकडे ‘पेटीएम्’ने या वृत्ताचे खंडन केले आहे. १४ सप्टेंबर या दिवशी ईडीने देहली, लक्ष्मणपुरी, गाझियाबाद, गया, मुंबई आदी ठिकाणी धाडी घातल्या होत्या.