१. ‘साधना करत असतांना आपल्या जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग मनोलयाकडे घेऊन जात असतो; मात्र मनोलय होण्यासाठी आपण प्रसंगाकडे शिकण्याच्या दृष्टीने आणि सकारात्मकतेने पहायला हवे !’
२. ‘आपली शिकण्याची स्थिती अल्प असेल, तर साधनेच्या एका टप्प्यावर निरुत्साह येऊ शकतो. त्यामुळे साधकाने सतत शिकण्याच्या स्थितीत राहिले पाहिजे. सतत शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (वर्ष २०२२)