दसर्‍याच्या उत्सवामध्ये अश्‍लील नृत्य आणि गीते वाजवणे यांवर बंदी !

मद्रास उच्च न्यायालयाचा तमिळनाडू राज्यासाठी आदेश

मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने आगामी दसरोत्सवामध्ये अश्‍लील नृत्य करणे आणि अश्‍लील गीते वाजवणे यांवर बंदी घातली आहे. जर कुणी तसा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, असा आदेश पोलिसांना दिला आहे. या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा निर्णय दिला. ‘दसरोत्सवात आयोजक आणि संगीत यंत्रणा पुरवणारे यांना भक्तीगीतांच्या व्यतिरिक्त अन्य गाणी वाजवण्यात येऊ नयेत, तसेच अश्‍लील नृत्य करू नये’, असा आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. ‘याद्वारे लाखो भक्तांची पारंपरिक संस्कृती, तसेच धार्मिक भावना यांचे रक्षण करावे’, असे म्हटले होते.

संपादकीय भूमिका

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? उत्सव साजरा करणार्‍या हिंदूंना हे कळत नाही का ?