मक्केतील मशिदीमध्ये ब्रिटनच्या महाराणीसाठी प्रार्थना करणार्‍या मुसलमानाला अटक

अटक करण्यात आलेला येमेन देशातील नागरिक

रियाध (सौदी अरेबिया) – येमेन देशातील एका नागरिकाला सौदी अरेबियामध्ये अटक करण्यात आली. या नागरिकाने मक्केतील ग्रँड मशिदीमध्ये हातात एक फलक धरला होता. या फलकावर ‘महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या आत्म्याच्या शांततेसाठी प्रार्थना करतो की, देवाने तिला स्वर्गामध्ये स्वीकार करावे’, असे लिहिले होते. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.

मक्केची यात्रा करणार्‍यांना तेथे फलक घेऊन जाण्यास तसेच कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास बंदी आहे. तसेच मृत मुसलमानासाठी प्रार्थना करण्याची अनुमती आहे; मात्र मुसलमानेतरांसाठी नाही. (मुसलमानांच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कठोर नियमांचे पालन करावे लागते आणि त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई होते. हिंदूंनी मात्र त्यांच्या धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्यासाठी काही नियम केल्यास ‘व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणली गेली’, असे सांगत निधर्मीवादी टीका करतात. अशांनी मक्केतील घटनेविषयी बोलावे ! – संपादक)