पाकमध्ये पोलिओविरोधी लसीकरण पथकावरील आक्रमणात ४ पोलीस ठार  

प्रातिनिधिक छायाचित्र

खैबर पख्तुनख्वा (पाकिस्तान) – या प्रांतात ९ सप्टेंबर या दिवशी पोलिओविरोधी लसीकरण पथकाला संरक्षण देणार्‍या पोलीस पथकावर अज्ञातांनी आक्रमण केले. यात ४ पोलीस ठार झाले, तर २ जण घायाळ झाले. येथील टँक जिल्ह्यातील गुल इमान भागात ही घटना घडली. पोलीस आणि आक्रमणकर्ते यांच्यामध्ये बराच वेळ गोळीबार चालू होता. आतापर्यंत कोणत्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेली नाही.

यापूर्वीही पाकिस्तानमध्ये पोलिओविरोधी लसीकरण पथकावर आक्रमणे झाली आहेत. यावर्षी २८ जून या दिवशी उत्तर वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यात पोलिओविरोधी लसीकरण पथकावर झालेल्या आक्रमणात २ पोलिसांसह ३ जण ठार झाले होते. ३० जुलै या दिवशी पेशावरच्या दौदझई भागात लसीकरण पथकाला संरक्षण देणार्‍या एका पोलिसाला ठार करण्यात आले होते. खैबर पख्तुनख्वामध्ये १ ऑगस्ट या दिवशी पथकाचे रक्षण करणार्‍या पोलीस अधिकार्‍याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर १५ ऑगस्ट येथे २ पोलिसांना गोळ्या घालण्यात आल्या.

पोलिओ लसीकरण पथकावर का होतात आक्रमणे ?

पाकिस्तानातील अनेक भागात लोक पोलिओविरोधी लसीकरणाच्या विरोधात आहेत. ‘पोलिओच्या लसीमुळे लोकांमध्ये वंध्यत्व येते’, असे त्यांचे म्हणणे आहे.