यति नरसिंहानंद यांच्याकडून डिसेंबर मासात धर्मसंसदेचे आयोजन

महंत यति नरसिंहानंद सरस्वती

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील डासनामधील शिव-शक्ति धामचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी यावर्षी १७ आणि १८ डिसेंबर या दिवशी शहरात धर्मसंसदेचे आयोजन केले आहे. यात साधू आणि संत यांचा सहभाग असणार आहे. याचवर्षी हरिद्वार येथे त्यांनी आयोजित केलेल्या धर्मसंसदेत कथित आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आला होता. तसेच या प्रकरणी जितेंद्र त्यागी (पूर्वीश्रमीचे वसीम रिझवी) यांना अटक करण्यात आली आहे.

महंत यति नरसिंहानंद म्हणाले की, पूर्वी डासना हिंदुबहुल भाग होता; मात्र येथील हिंदु व्यापारी उद्योगानिमित्त अन्यत्र जाऊन वसले. त्यामुळे येथे आता ९५ मुसलमान लोक रहातात. त्यांनी येथे त्यांची लोकसंख्या जलद गतीने वाढवली आहे