श्री गणेशचतुर्थीलाच वीज वितरण आस्थापनाकडून सोलापुरात विजेचा अनियमित पुरवठा !

सोलापूर – श्री गणेशचतुर्थीलाच वीज वितरण आस्थापनाकडून विजेचा अनियमित पुरवठा होत होता. दुपारी आणि सायंकाळी शहरात अनेक भागांत वीज नव्हती. एकीकडे गणेशभक्त उत्साहात श्री गणेशाच्या आगमनाचे स्वागत करत होते, तर वीज नसल्यामुळे त्यांच्या उत्साहावर वीरजण पडत होते. (असाच दुजाभाव वीज वितरण आस्थापनाने अन्य धर्मियांच्या सणांविषयी केला असता का ? प्रत्येक वेळी हिंदूंचे सण आल्यावरच प्रशासन कानाडोळा का करते ? – संपादक)