चिखली (जि. बुलढाणा) – येथील विठ्ठल रुक्मिणी, तसेच आदिशक्ती मुक्ताबाई मंदिरात श्री गणेशचतुर्थी आणि गणेशोत्सव यांसंदर्भात प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
श्री गणपतीची मूर्ती कशी असावी, श्री गणेशाला लाल फुले आणि दुर्वा का अन् कशा वहाव्यात ? श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात अन् नैसर्गिक जलस्रोतांमध्ये का करावे ? या शास्त्रासमवेत श्री गणेशमूर्तीचे होणारे विडंबन आणि धर्महानी यांविषयीची माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद येवले यांनी या प्रसंगी उपस्थितांना दिली. या वेळी गणपतीचा सामूहिक नामजप आणि प्रार्थना करण्यात आली. या प्रवचनाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. धर्मप्रेमी सर्वश्री सुजित कोरे आणि विशाल धारे यांचे या कार्यात सहकार्य लाभले.