गोव्यात गतवर्षी बलात्कार पीडितांपैकी ६६.२१ टक्के अल्पवयीन मुली ! – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग

पणजी, ३० ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात वर्ष २०२१ मध्ये  बलात्कारपीडितांपैकी ६६.२१ टक्के अल्पवयीन मुली आहेत. गतवर्षी गोव्यात बलात्काराची ७२ प्रकरणे नोंद झालेली आहेत आणि बलात्कार पीडितांपैकी ४९ अल्पवयीन आहेत. तसेच ६८ प्रकरणांमध्ये (९४.४ टक्के) संशयित पीडिताच्या ओळखीचा आहे, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालात दिली आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, ७२ प्रकरणांपैकी ९ प्रकरणांमध्ये संशयित कुटुंबातील एक सदस्य होता, तर अन्य ४६ प्रकरणांमध्ये संशयित हा पीडितेचा मित्र किंवा ‘ऑनलाईन’ संपर्क आल्याने मित्र झालेला किंवा लग्नाचे आमीष दाखवून ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये रहाणारा किंवा घटस्फोटीत पीडित महिलेसमवेत रहाणारा आहे. अन्य १३ प्रकरणांमध्ये संशयित कुटुंबाचा मित्र किंवा शेजारी किंवा पीडित काम करत असलेल्या ठिकाणचा किंवा अन्य व्यक्ती आहे. (यातील लव्ह जिहादची प्रकरणे किती आहेत, तीही घोषित करायला हवीत ! अनेक राज्यांत हिंदु नाव धारण करून धर्मांध मुसलमान तरुणांकडून हिंदु मुलींना फसवले जात आहे. – संपादक)

राज्यात गतवर्षी अपहरणाची ५२ प्रकरणे नोंद

राज्यात गतवर्षी अपहरणाची ५२, दंगल घडवण्यासंबंधी ४०, चोरीची २७, दरोड्यासंबंधी १, जाळपोळ केल्याची ९, अमली पदार्थ व्यवहाराशी निगडित १२१, हत्येसंबंधी २६ आणि महिलांवरील अत्याचारासंबंधी ७४ गुन्हे नोंद झालेले आहेत.