पुणे पोलीस आणि महापालिका यांच्या गणेशोत्सव मंडळांसाठी सूचना !

पुणे – महापालिका प्रशासन आणि पुणे पोलीस यांनी गणेश मंडळांसाठी विसर्जन मिरवणूक आणि रथाच्या देखाव्याच्या उंची संदर्भात महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. संभाजीपूल येथे मेट्रोच्या पुलामुळे रथाची उंची देखाव्यासह १८ फूट तर कर्वे रस्त्यावर गरवारे मेट्रो स्टेशन असल्याने रथाच्या देखाव्याची उंची १६ फूट आणि रुंदी १२ फूट ठेवावी, असे आवाहन डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी केले आहे.