टिटवाळा येथे शिक्षिकेच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या मनगटाचा अस्थीभंग !

कल्याण – शाळेत दोन विद्यार्थ्यांच्या क्षुल्लक वादानंतर शिक्षिकेकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर शिक्षिकेने १५ वर्षांच्या एका मुलाच्या हातावर काठीने मारले; पण यात त्याच्या मनगटाचा अस्थीभंग झाला. टिटवाळा येथील शकुंतला विद्यालयात घडली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलिसांनी शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रिया सिंग असे शिक्षिकेचे नाव आहे. ‘शाळा प्रशासनाने या प्रकरणी संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल’, असे स्पष्ट केले आहे.

संपादकीय भूमिका 

असे असंवेदनशील शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ?