भगवान शिवासम वैशिष्ट्ये असलेले सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

‘एका सोमवारी मी भगवान शिवाचे स्मरण करत होते. त्या वेळी मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांची आठवण होऊन त्यांच्याविषयी पुढील सूत्रे जाणवली.

१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना पाहिल्यावर शिवाचे अस्तित्व जाणवणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना प्रत्यक्ष किंवा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांचे छायाचित्र पाहिल्यावर मला भगवान शिवाचे स्मरण होते आणि माझे मन शांत होते, तसेच माझी भावजागृती होते. माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणताही विचार नसतो; पण त्यांच्याकडे पाहून मला शिवाचे अस्तित्व जाणवते.

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी समभावाने आणि साक्षीभावाने पहाणे

सद्गुरु काकांचे नेत्र मला भगवान शिवाच्या नेत्रांसमान वाटतात. ‘सद्गुरु काकांचे नेत्र स्थिर आहेत. त्यांची दृष्टी स्थिर आणि करूणामयी आहे. ते साक्षीभावात आहेत. ते सर्वांकडे समभावाने पहातात’, असे मला जाणवते.

३. सद्गुरु गाडगीळकाकांचे मन निर्मळ आहे. त्यांच्या चेहर्‍यावर समाधान जाणवते.

४. ‘सद्गुरु गाडगीळकाकांचे आज्ञाचक्र सतत जागृत असते’, असे मला वाटते.

५. सद्गुरु काकांना पाहिल्यावर मन निर्विचार आणि शांत होणे 

माझ्या मनात अनेक विचार असतांना मी सद्गुरु काकांचे नेत्र आणि चेहरा पाहिल्यावर माझे मन शांत होऊन स्थिर होते. मला त्यांचा चेहरा शिवासम जाणवतो.

६. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय गंगेप्रमाणे पवित्र असून सर्व त्रासांचा नाश करणारे असणे

भगवान शिवाच्या मस्तकावर माता गंगेचे स्थान असून ती निरंतर वहात असते. त्याप्रमाणे सद्गुरु काकांकडून उपायगंगा (ज्ञानगंगा) अखंड वहात असते. गंगेमुळे लोकांचे पाप नष्ट होते, त्याप्रमाणे सद्गुरु काकांनी साधकांना होत असलेल्या त्रासावर सांगितलेल्या नामजपादी उपायांनी साधकांचे त्रास दूर  होतात. सद्गुरु काकांनी सांगितलेले नामजपादी उपाय गंगेप्रमाणे पवित्र असून सर्व त्रास नष्ट करणारे आहेत.

७. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची ध्यानावस्था

भगवान शिव अखंड ध्यानावस्थेत असतात. सद्गुरु काका साधकांना होणार्‍या त्रासांवर नामजपादी उपाय शोधण्यासाठी ध्यान करतात. तेव्हा ते भगवान शिवासम वाटतात.

८. भगवान शिव निर्गुण स्तरावर असतात. ‘सद्गुरु काका निर्गुणावस्थेत असतात’, असे मला जाणवते.

– सोनाली बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२१)