ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या प्रकाशनाची ध्वनीचित्र-चकती पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती

आज भागवत एकादशी, २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले यांचा ८७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला आलेली अनुभूती येथे देत आहोत.

पू. अनंत आठवले

पू. अनंत आठवले यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

‘१९.२.२०२२ या दिवशी रामनाथी आश्रमात सर्व साधकांना ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या ग्रंथाचे प्रकाशन केल्याची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. ती पहातांना मला आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) आणि त्यांच्या पत्नी सौ. सुनीती अनंत आठवले यांच्याभोवती प्रकाशनाच्या वेळी पांढर्‍या रंगाची प्रकाशरूपी वलये दिसत होती.

कु. प्रतीक्षा हडकर

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांचा संवाद चालू असतांना ऊर्जा जाणवणे आणि एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे जाणवणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि पू. भाऊकाका यांचा संवाद चालू असतांना मला एक प्रकारची ऊर्जा जाणवत होती. ‘त्यांचे बोलणे संपूच नये’, असे मला वाटत होते. त्यांचे संवाद ऐकतांना मला एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे जाणवत होते. सत्संगातील संवाद जसजसा पुढेपुढे जात होता, तसतशी प्रकाशवलयेसुद्धा वाढत होती. दैवी तेजाची वलये पहातांना माझे डोळे दीपत होते. जणू त्यांच्याभोवती चैतन्यमय कवच निर्माण होऊन ते बोलत होते. ते दोघेही सत्संगात पूर्णपणे एकरूप होऊन गेले होते.

३. ‘वलये दिसणे, हा भास तर नाही ना ?’, असे वाटून डोळे २ – ३ वेळा पुसून पहाणे, तरीही तेजस्वी वलये दिसणे

‘मला प्रकाशवलये दिसत आहेत’, असा मला भास तर होत नाही ना ?’, असे काही वेळाने मला वाटले; म्हणून मी २ – ३ वेळा डोळे पुसून पाहिले; तरीही मला तेजस्वी वलये दिसतच होती. नंतर मी एका साधिकेला यासंदर्भात विचारल्यावर तिने ‘मला काही दिसत नाही’, असे सांगितले.

४. ‘ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांना प्रकाश आणि चैतन्य यांच्या रूपात भगवंत सात्त्विक ज्ञान ओतप्रोत (भरभरून) देत आहे’, असा विचार मनात येणे

सायंकाळी ६.३० वाजता मला श्री. अमित डगवार हा साधक भेटला. त्याला मी प्रकाशवलये दिसल्याचे सांगितले. त्या वेळी ‘त्यालाही वलये दिसली; परंतु त्यांचा रंग पिवळसर होता’, असे त्याने सांगितले. ‘मला पांढरे वलय दिसले होते. दुसर्‍या साधकाला पिवळसर वलय दिसले. तेही अन्य कुणाला दिसले नाही. याचे कारण काय असेल ?’, असे मला वाटले. तेव्हा पांढरेशुभ्र वलय म्हणजे ‘तेजस्वी प्रकाश’ आणि पिवळे वलय म्हणजे ‘चैतन्य’, असे मला जाणवले. यावरून ‘पू. भाऊकाकांना प्रकाश आणि चैतन्य यांच्या रूपात भगवंत सात्त्विक ज्ञान ओतप्रोत (भरभरून) देत आहे’, असा माझ्या मनात विचार आला.

५. ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू  आणि ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांचे सत्संगातील बोलणे उच्च स्तरावर होत आहे’, असे मला जाणवले.’

– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक