दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या काळात सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या संर्दभात आलेल्या बुद्धीअगम्य अनुभूती

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

१. चैतन्य जाणवणे आणि शांतीची अनुभूती येणे

‘यंदा झालेल्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या काळात पू. नीलेश सिंगबाळ यांच्या सहवासात पुष्कळ चैतन्य जाणवत असे. मनाला शांती जाणवत असे. त्यांच्याकडे पहाते, तेव्हा ते एखाद्या ऋषींप्रमाणेच दिसतात.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२९.६.२०२२)

२. पू. नीलेश सिंगबाळ यांच्या वस्तू हातात घेतल्यावर हलकेपणा जाणवून मन निर्विचार होणे

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी बाबा (सद्गुरु नीलेश सिंगबाळ) वाराणसीहून गोव्याला आले, तेव्हा ‘त्यांच्यात पुष्कळ परिवर्तन झाले आहे’, असे जाणवले. त्यांच्या वस्तू हातात घेतल्यावर हलकेपणा जाणवणे, मन निर्विचार होणे आदी अनुभूती आल्या. ‘ते तेजस्वी दिसत आहेत’, ‘त्यांच्या मुखावरील प्रकाश वाढला आहे’, असेही मला जाणवले.’ – श्री. सोहम् सिंगबाळ (२९.६.२०२२)

३. तोंडवळ्याभोवती प्रभावळ आणि प्रकाश जाणवणे

‘यंदा साधनाविषयक शिबिराच्या कालावधीत सद्गुरु नीलेशदादा यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या सहवासात हलकेपणा जाणवत असे. शिबिरात त्यांचे मार्गदर्शन चालू असतांना त्यांच्या मुखावर प्रकाश जाणवत असे, तसेच काही वेळा त्यांच्या मुखाभोवती प्रभावळ दिसत होती.

३ अ. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे साधकांशी बोलणे पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण होणे

सद्गुरु नीलेशदादांचे बोलणे, साधकांकडे पहाणे यांतून परात्पर गुरुदेवांचे स्मरण होते. त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी असलेली एकरूपता त्यांच्या सहवासात जाणवते.’                                                  (क्रमश:)

– पू. (सौ.) संगीता जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था (२९.६.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या आणि वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक