रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. अतुल बधाले यांचा श्रावण कृष्ण दशमी (२१ ऑगस्ट २०२२) या दिवशी २६ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त श्री. धैवत वाघमारे यांना त्यांच्याविषयी सुचलेली कविता आणि त्यांच्या नावाचा अर्थ येथे देत आहोत.
अ – अलगद सावरले प्रारब्धातूनी भगवंताने ।
तु – तुजला पंखाखाली घेतले सद्गुरूने (टीप १)।
ल – लक्ष असे प्रत्येक क्षणी वैकुंठ भूपतीचे (टीप २)।
ब – बघ हाक मारितो प्रभाती तुजला ।
धा – धाम जेथे सृष्टीपालकाचे (टीप ३)।
ले – लेकरू शरण येता त्यासी कुरवाळे गुरुमाऊली ।
टीप १ – सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये
टीप २ – विष्णुस्वरूप गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
टीप ३ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची रामनाथी आश्रमातील खोली
लेखणी घेई करी । गुण त्याचे वर्णाया ।।
लेखणी घेई करी ।
गुण त्याचे (टीप) वर्णाया ।। १ ।।
कर गुणगौरव भगवंताचा ।
कीर्तन कर त्याच्या शिकवणीचे ।। २ ।।
प्रीती असे तुजवरी तयाची ।
तोच गाऊनी घेईल महती ।। ३ ।।
धरावे चरण करावे स्मरण ।
जाता शरण होईल उद्धरण ।। ४ ।।
टीप – विष्णुस्वरूप गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.८.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |