अभिनेत्री नूपुर अलंकार यांनी घेतला संन्यास !

नूपुर अलंकार

मुंबई – मागील २७ वर्षे अभिनेत्री म्हणून कलाविश्वात काम केलेल्या अभिनेत्री नूपुर अलंकार यांनी संन्यास घेतला आहे. अभिनेत्री नूपुर एका मुलाखतीत म्हणाल्या, ‘‘मी धार्मिक स्थळांना भेटी देण्यात आणि गरजूंना साहाय्य करण्यात मग्न होते. माझा नेहमीच आध्यात्मिकतेकडे कल राहिला आहे. त्यामुळे मी यात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले आहे. हिमालयात राहून माझा आध्यात्मिक प्रवास होणार आहे. मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मी मुंबई येथील घर भाड्याने दिले आहे. मला या मार्गाकडे जाण्यासाठी कोणत्याही कारणांची आवश्यकता नाही.’’ नूपुर या वर्ष २००७ पासून योग साधनेविषयी अभ्यास करत आहेत.