महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने अभ्यासलेला ठाणे येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांच्या गायनाचा सप्तचक्रांशी संबंधित विविध व्याधींवर झालेला परिणाम !

‘१२ ते १५.४.२०२२ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने ‘ठाणे येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांच्या शास्त्रीय गायनाचा सप्तचक्रांशी संबंधित विविध व्याधींवर कसा परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करण्यासाठी संशोधनात्मक प्रयोग केले. या प्रयोगाच्या वेळी त्यांनी सप्तचक्रांशी संबंधित विविध व्याधींसाठी त्या त्या चक्राशी संबंधित स्वर असलेले प्रधान राग निवडून त्याचे गायन केले. त्या वेळी ‘या गायनाचा त्या त्या चक्राशी संबंधित व्याधी असलेल्या, आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यात आले.

या संशोधनात्मक प्रयोगासाठी ‘यू.ए.एस्.’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या उपकरणाच्या माध्यमातून व्यक्ती, वस्तू आणि वास्तू यांच्यातील सकारात्मक अन् नकारात्मक प्रभावळ मोजता येते. या उपकरणाच्या आधारे केलेल्या या प्रयोगाचा निष्कर्ष पुढील सारणीत दिला आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१. पू. किरण फाटक यांनी गायलेल्या त्या त्या चक्रांशी संबंधित राग गायनाचे दिसून आलेले परिणाम

पू. किरण फाटक

२. पू. किरण फाटक यांनी गायलेल्या त्या त्या चक्रांशी संबंधित राग गायनाचा त्या चक्राशी संबंधित व्याधी असणार्‍या साधकांवर दिसून आलेला परिणाम

३. या प्रयोगाच्या वेळी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले  

३ अ. मणिपूरचक्राशी संबंधित गायन चालू असतांना भाषा आणि गायन समजत नसूनही एका विदेशी साधिकेच्या मणिपूरचक्रावर परिणाम होऊन तिचे पोट दुखणे

कु. तेजल पात्रीकर

पू. फाटककाका एकेका चक्राशी संबंधित रागाचे गायन करत होते. तेव्हा आध्यात्मिक त्रास असणार्‍या बर्‍याच साधकांच्या त्या त्या चक्रावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत होते. त्यांच्या गायनाचा त्या त्या चक्राच्या स्थानी अचूक परिणाम होत होता, उदा. पू. काकांचे मणिपूरचक्राशी संबंधित गायन चालू असतांना एका विदेशी साधिकेला पुष्कळ त्रास होत होता. ती पोटावर हात ठेवून कळवळत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला हिंदी कळत नाही. त्यामुळे गायनापूर्वी पू. काकांनी हिंदीत सांगितलेली माहिती तिला कळली नव्हती आणि ‘पू. काका काय गात आहेत ?’, हेही तिला कळत नव्हते, तरीही पू. काकांच्या गायनाचा परिणाम तिच्या मणिपूरचक्रावर झाल्यामुळे तिला तीव्र पोटदुखी होत होती.

३ आ. पू. काकांचे आज्ञाचक्राशी संबंधित स्वरांचे गायन चालू असतांना आध्यात्मिक त्रास असलेल्या अनेक साधकांचे डोके दुखत होते.

(‘शास्त्रीय संगीत मुळातच चैतन्यदायी आहे अन् पू. किरण फाटक हे संत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वरात अधिक चैतन्य आहे. आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांच्या चक्रांच्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात. पू. फाटककाकांच्या चैतन्यदायी संगीतामुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या त्या-त्या चक्रावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले. त्यामुळे साधकांना त्या त्या चक्राच्या स्थानी त्रास जाणवला.’ – संकलक)

३ इ. केवळ एक घंटा चैतन्यदायी संगीत ऐकल्यावर ऐकणार्‍यांची नकारात्मकता अनेक पटींनी घटून सकारात्मक ऊर्जेत दुपटीने किंवा तिपटीने वाढ होणे

३ इ १. आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर गायनाचा दिसून आलेला परिणाम ! : केवळ ४५ मिनिटे ते १ घंटा हे चैतन्यदायी संगीत ऐकल्यावर आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांची नकारात्मक ऊर्जा ५० टक्क्यांहून न्यून झाली, तर सकारात्मकता सरासरी १०० ते २०० टक्क्यांहून अधिक वाढली. एका प्रयोगाच्या वेळी त्यांची सकारात्मक ऊर्जा ५० ते ८२२ टक्क्यांनी वाढली.

३ इ २. आध्यात्मिक त्रास नसणार्‍या साधकांवर गायनाचा दिसून आलेला परिणाम ! : आध्यात्मिक त्रास नसणार्‍या साधकांची नकारात्मक ऊर्जा सरासरी ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात न्यून झाली. एका प्रयोगाच्या वेळी सकारात्मक ऊर्जा १४१ ते २३३ टक्क्यांनी वाढल्याचे सारणीवरून लक्षात आले.

३ ई. पू. फाटककाका यांना तबल्यावर साथ देणार्‍या साधकाची सकारात्मकता कधी दुपटीने, तर कधी तिपटीने वाढली.

३ उ. पू. किरण फाटक यांच्यावर दिसून आलेला परिणाम !

पू. किरण फाटक यांची नकारात्मक ऊर्जा ७० टक्क्यांनी अल्प झाली. काही प्रयोगांच्या वेळी त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नष्टही झाली आणि त्यांची सकारात्मक ऊर्जा सरासरी २५ ते ३० टक्क्यांनी वाढली.

४. निष्कर्ष

वरील सारणीमधून असे लक्षात येते की, पू. किरण फाटक हे संत असल्याने त्यांच्या स्वरांत पुष्कळ चैतन्य आहे. या चैतन्यमय स्वरांमुळे त्यांच्या गायनाचा साधक श्रोतृवर्गावर अधिक सकारात्मक परिणाम दिसून आला. त्यांच्या चैतन्यमय संगीताचा सर्वांनाच शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक स्तरांवर लाभ झाला. सामान्य कलाकाराच्या तुलनेत संत कलाकार असतील, तर त्यांच्यातील चैतन्यानेच सर्वाधिक परिणाम होतो. त्यांच्यातील आध्यात्मिक सामर्थ्याची प्रचीतीही वरील परीक्षणावरून लक्षात येते.

‘संगीत कलाकारांनो, संगीताला साधनेची जोड देऊन संगीत ही ईश्वराची आराधना म्हणून केल्यास त्याचा अधिकाधिक सकारात्मक परिणाम स्वतःच्या समवेत ऐकणार्‍यांवरही होतो. हे लक्षात घेऊन आजच साधनेला आरंभ करा !’

या विषयाशी संबंधित अन्य संशोधनही लवकरच प्रकाशित करत आहोत.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.७.२०२२)

संपादकीय भूमिका

संगीत हे ईश्वराची आराधना म्हणून केल्यास त्याचा अधिकाधिक सकारात्मक परिणाम स्वत:च्या समवेत ऐकणार्‍यांवरही होतो !


  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक