गुरुमाऊलीचे ज्ञान अन् चैतन्य देण्या ती सोलापूर नगरीत आली ।

पू. दीपाली मतकर, सोलापूर यांचा मागील वर्षी २४.७.२०२१ या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने साधिकेला (त्या संत होण्यापूर्वी) सुचलेल्या कविता पुढे दिली आहे.

पू. (कु.) दीपाली मतकर

करूनी हो त्याग मायेचा
भूवैकुंठी ती (टीप १) आली ।
गुरुमाऊलीच्या हस्तस्पर्शाने पावन ती जाहली ।। १ ।।

कु. वैष्णवी दसाडे

गुरुमाऊलीच्या प्रत्यक्ष चरणसेवेने धन्य ती जाहली ।
गुरुमाऊलीच्या चैतन्याने भारित ती जाहली ।। २ ।।

घडवी तिच्यातच स्वतःचे प्रतिरूप गुरुमाऊली ।
वैकुंठी (टीप २) असता ती माऊलीशी
स्थुलातूनी एकरूप झाली ।। ३ ।।

गुरुमाऊलीचे ज्ञान अन् चैतन्य देण्या
ती सोलापूर नगरीत आली ।
गुरुमाऊलीच्या व्यापक अन् सूक्ष्म रूपाशी
एकरूप होण्या ती आली ।। ४ ।।

टीप १ – पू. दीपाली मतकर

टीप २ – रामनाथी आश्रम, गोवा


आनंद अन् सकारात्मकता यांचे मूर्तीमंत उदाहरण दीपालीमाऊली ।

वाणीत असे मधुर शब्द समष्टीसाठी ।
स्पर्शाने करत असे ती (टीप १) प्रीती सर्वांवरी ।। १ ।।

तिची तळमळ अन् साधकांना घडवणे ।
यामुळेच धन्य धन्य जाहली सोलापूर नगरी ।। २ ।।

आम्हा अज्ञानी जिवांना ज्ञात नसे कसे असते गुरु-शिष्याचे नाते ।
दीपालीमाऊली, दिसतसे तुझ्यातच आम्हाला गुरुमाऊली ।। ३ ।।

सर्व अडथळ्यांशी लढूनी कशी ठेवावी अचल श्रद्धा ।
अन् ध्येयासाठी कसे झिजावे, दाखवी ही माऊली ।। ४ ।।

असे आमची ही दीपालीमाऊली ।
आनंद अन् सकारात्मकता यांचे मूर्तीमंत उदाहरण ।। ५ ।।

टीप १ – पू. दीपाली मतकर

– कु. वैष्णवी दसाडे, सोलापूर (२८.८.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक