पू. दीपाली मतकर यांचा २८.१०.२०२१ या दिवशी संतसन्मान सोहळा झाला. त्या निमित्ताने आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा कोठावळे यांना सुचलेले काव्य येथे दिले आहे.
कलियुगामध्ये श्रीकृष्णाने निर्मिल्या गोपी ।
त्यांच्यामधील एक आहे ‘गुरुदेवांची दीपाली’ ।। १ ।।
लहानपणापासून तिचे जीवन होते खडतर ।
प्रत्येक अडचणीच्या वेळी तिने केला ‘देवाचा जागर’ ।। २ ।।
निर्भयता, तळमळ, देवावरची श्रद्धा अन् भक्ती ।
अशा दैवी गुणांची आहे तिची ख्याती ।। ३ ।।
अशी ही सुंदर गोपी एकदा पडली आजारी ।
तीव्र त्रास होऊन मृत्यूच्या दारापर्यंत पोचली ।। ४ ।।
केवळ तिच्या भक्तीमुळे देवाने तिला वाचवले ।
संतांच्या आशीर्वादाने तिला या संकटातून सोडवले ।। ५ ।।
देव तिला म्हणाला, ‘अगं, मी किती तुझी वाट पाहिली’ ।
अजून पुष्कळ सेवा आहेत, हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी ।। ६ ।।
या गोपीने घेतला गुरुदेवांचा (टीप) ज्ञानरूपी वसा ।
सज्ज झाली चालवण्यासाठी गुरुदेवांचा वारसा ।। ७ ।।
आमची ही लाडकी गोपी झाली संत ।
कोटीशः कृतज्ञता गुरुदेवा, तुमची कृपा आहे अनंत ।। ८ ।।
टीप – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा
– आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), कोल्हापूर (२८.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |