पुणे – संशयित आरोपीच्या विरोधात प्रविष्ट असलेल्या एका प्रकरणामध्ये त्याला उपस्थित करून घेणे, तसेच त्याला जामीन मिळवून देणे यांसाठी कोथरूडमधील साहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस हवालदार विजय शिंदे याला ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ही कारवाई साहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारामध्ये करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
संपादकीय भूमिकापोलीस विभागातील भ्रष्टाचारच संपत नाही, हे दुर्दैवी आणि संतापजनक ! लाचखोर पोलिसांना अन्यांच्या तुलनेत अधिक कठोर शिक्षा द्यायला हवी ! |