भारत श्रीलंकेला देणारा समुद्रावर लक्ष ठेवणारे ‘डोर्नियर’ विमान

कोलंबो (श्रीलंका) – भारत श्रीलंकेला समुद्रावर लक्ष ठेवणारे एक ‘डोर्नियर’ विमान देणार आहे. कोलंबो येथे एका कार्यक्रमात हे विमान देण्यात येणार असून त्या वेळी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे उपस्थित रहाणार आहेत. वर्ष २०१८ मध्ये दोन्ही देशांमध्ये २ ‘डोर्नियर’ विमाने देण्याविषयी करार झाला होता. (वर्ष २०१८ जरी करार असला, तरी आताची परिस्थिती पहाता तो रहित करणे किंवा स्थगित करणे आवश्यक होते ! आधीच श्रीलंकेचे नौदल भारतीय मासेमारांना त्यांच्या सीमेमध्ये घुसखोरी केल्याचे सांगत अटक करत असतेच. अशात जर या विमानाचा वापर भारताच्या विरोधात करण्यात आला, तर त्याला कोण उत्तरदायी असेल ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

एकीकडे श्रीलंकेने पाकची युद्धनौका आणि चीनची गुप्तहेर नौका यांना त्याच्या बंदरावर येण्यास अनुमती दिली असतांना दुसरीकडे भारताने श्रीलंकेला अशा प्रकारचे सैनिकी साहाय्य करणे किती योग्य आहे ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो !