लाच मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या लबडे यांना निलंबित करून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश !

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयामध्ये ३ ऑगस्ट या दिवशी संदीप लबडे या नगरविभागातील सर्वेक्षण करणार्‍या कर्मचार्‍याला ३ लाख रुपये मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी एका नागरिकाने तक्रार केली होती.