करंजी (जिल्हा चंद्रपूर) येथे पूल नसल्याने पाण्यातून अंत्ययात्रा !

माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या गावातील ग्रामस्थांचे हाल; पुलाला निधी मिळेना !

नाल्यातील पुराच्या गुडघाभर पाण्यातून गावकर्‍यांना अंत्ययात्रा काढावी लागते

चंद्रपूर – काँग्रेसचे नेते आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या जन्मगाव करंजी येथील नाल्यावर पूल नाही, तसेच संततधार पावसामुळे गावातील नाला दुथडी भरून वहात आहे. त्यामुळे नाल्यातील गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याचा वेदनादायक प्रसंग गावकर्‍यांवर ओढवला. याविषयी त्यांनी अप्रसन्नतेचा सूर व्यक्त केला आहे.

गेली अडीच वर्षे राज्यात महविकास आघाडीची सत्ताकाळात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांच्याकडे ‘करंजी गावातील स्मशानभूमी रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधावा’, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा तालुका, जिल्हा प्रशासन यांच्यासह केली होती.