‘राजा शिवछत्रपती परिवार’ संघटनेच्या वतीने १४ ऑगस्टला मल्हारगड येथे स्वच्छता मोहीम !

पुणे, १३ ऑगस्ट (वार्ता.) – ‘राजा शिवछत्रपती परिवार’ संघटनेच्या वतीने १४ ऑगस्ट या दिवशी मल्हारगड येथे गड स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सोनोरी (सासवड) गावाजवळ असलेल्या मल्हारगडाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी मागील ६ वर्षांपासून ही मोहीम वेळोवेळी आयोजित करण्यात येत आहे.

‘ज्याप्रमाणे मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत, त्याचप्रमाणे गड-दुर्ग ही स्फूर्ती स्रोत आहेत, असे आम्ही मानतो. या स्फूर्ती स्रोतांचे रक्षण करण्यासाठी, त्याला पुनरुज्जीवन देण्यासाठी शारीरिक श्रमाची अभेद्य जोड लागते. यासाठीच मल्हारगडावर मोहीम राबवण्यात येत आहे. आपण या कार्यात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवाल, अशी आम्हाला खात्री आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ८००७९९९९४२ या क्रमांकावर संपर्क करावा’, असे आवाहन ‘राजा शिवछत्रपती परिवार’ संघटनेकडून करण्यात आले आहे.