तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला पशू तस्करीच्या प्रकरणी अटक

तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रत मंडल

कोलकाता (बंगाल) – पशू तस्करीच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने बोलपूर येथे धाड टाकून तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रत मंडल यांना अटक केली. ते तृणमूलचे वीरभूमचे जिल्हाध्यक्ष आहेत. या प्रकरणी त्यांचा अंगरक्षक सैगल हुसेन याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. वर्ष २०२० मध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर त्यांची दोन वेळा चौकशीही करण्यात आली होती. वर्ष २०१५ ते २०१७ या कालावधीत सीमा सुरक्षा दलाला २० सहस्रांहून अधिक पशूंचे शीर सापडले होते.

संपादकीय भूमिका

पशू तस्करी, म्हणजे गोवंशांचीच तस्करी असणार यात शंका नाही. गोवंशियांच्या तस्करी करणारे नेते असणारा तृणमूल काँग्रेस हिंदुद्रोहीच होय !