कोप्पल (कर्नाटक) – येथे मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीशी केलेल्या विवाहावरून झालेल्या वादातून २ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण गंभीररित्या घायाळ झाले. या घटनेमुळे येथे कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे. पशावली महंमद साबा (वय २७ वर्षे) आणि यंकप्पा शामप्पा तलवार (वय ४४ वर्षे ) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही कोप्पल जिल्ह्यातील हुलिहैदर गावातील रहाणारे आहेत. पशावली याने तलवार समाजाच्या एका मुलीशी विवाह केला होता. त्यामुळे या समाजातील लोक अप्रसन्न होते. गावात तणावपूर्ण स्थिती होती.
कर्नाटक: कोप्पल में विवाह को लेकर सांप्रदायिक हिंसा, 2 लोगों की मौत, धारा 144 लागू #karnataka #कर्नाटक https://t.co/f46xk1t710
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) August 11, 2022
संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिदूंना वाटते ! कर्नाटकमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करण्यात आला असतांनाही धर्मांधांना कायद्याचे भय नसल्याने अशा घटना अद्यापही घडत आहेत. हे लक्षात घेता या कायद्यात आता आणखी कठोर शिक्षा करण्याची तरतूद करणे आवश्यक आहे ! |