गुरुदेवा, क्षणभरही तुमचा विसर न व्हावा ।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

श्री. तुकाराम लोंढे

काळजी वाटे हो माझ्या जिवा ।
रामनाथीला (टीप १) असे माझ्या जिवाचा ठेवा ।। १ ।।

केव्हा भेटेन वाटते माझ्या जिवा ।
श्रीगुरु माझ्या अंतरीचा ठेवा ।। २ ।।

एवढेच मागणे श्रीगुरु देवा ।
क्षणभरही तुमचा विसर न व्हावा ।। ३ ।।

हेच मागणे आहे गुरुदेवा ।
आशीर्वाद आम्हा सर्व साधकांवर असू द्यावा ।। ४ ।।

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले हे सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे आहेत.

– श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.६.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक