‘हिंदु जनजागृती समिती’च्या संकेतस्थळावर ‘हॅकर्स’नी ताबा मिळवला असणे, त्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेला नामजपाचा उपाय करू लागल्यावर त्या समस्येवर उपाययोजना सहज सुचत जाऊन संकेतस्थळावरील ‘हॅकर्स’चे नियंत्रण दूर होणे आणि या सर्व उपाययोजना १ घंट्याच्या उपायाच्या कालावधीतच पूर्ण होणे

‘२३.७.२०२२ या दिवशी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या संकेतस्थळावर काही संशयित धारिका ‘अपलोड’ (upload) झाल्याचे लक्षात आले. अधिक अभ्यास केल्यावर संकेतस्थळावर ‘हॅकर्स’नी ताबा मिळवला असल्याचे स्पष्ट झाले. यावर संकेतस्थळावरील ‘हॅकर्स’चे नियंत्रण दूर करणे आणि ‘त्यांना पुन्हा तसे करता येऊ नये’, अशी उपाययोजना करणे आवश्यक होते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

देवाला प्रार्थना करून या सेवेला आरंभ केल्यावर ‘नेमक्या कुठल्या प्रकारे हे आक्रमण झाले आहे, किती प्रमाणात त्याचा परिणाम झाला आहे (उदा. संकेतस्थळावरील आपल्या माहितीमध्ये ‘हॅकर्स’नी पालट केला आहे का ?) इत्यादी विषयांचा अभ्यास सहज करता आला; मात्र या उपाययोजना करतांना ‘त्या पुरेशा आहेत का ?’, हे लक्षात येत नव्हते. तसेच काही उपाययोजना करतांना संकेतस्थळावरील काही सुविधा तात्पुरत्या बंद कराव्या लागणार होत्या.

श्री. अनित पिंपळे

मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना हा विषय कळवला. त्यांनी ‘१ घंटा ‘शून्य’ हा जप केल्यास अडचणी सुटतील’, असे सांगितले. तसेच त्यांनी हा जप करतांना उजव्या हाताचा तळवा नाकासमोर धरण्याचा न्यास करायला सांगितले होते. यानुसार ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रभाकर बिच्छूकाका यांनी हा नामजप करायला प्रारंभ केला. नामजपाच्या उपायाला आरंभ झाल्यावर मला पुढील टप्प्याच्या उपाययोजना सहज सुचत गेल्या आणि त्या कृतीत आणता आल्या. यामुळे संकेतस्थळावरील ‘हॅकर्स’चे नियंत्रण दूर झाले. उपाययोजना करण्यासाठी संकेतस्थळावरील ज्या सुविधा तात्पुरत्या बंद केल्या होत्या, त्याही पुन्हा चालू केल्यावर त्या योग्य प्रकारे कार्यरत झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तोही अडथळा आला नाही. विशेष म्हणजे या सर्व सेवा १ घंटा उपाय चालू होते, त्याच कालावधीत पूर्ण झाल्या.

‘आम्हाला उपाय दिल्याबद्दल सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी आणि ही सेवा सुरळीत करवून घेतल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’

– श्री. अनित पिंपळे, नागेशी, फोंडा, गोवा. (२३.७.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक