हुगळी (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या मोर्च्यावर आक्रमण

पोलिसांकडून भाजपच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक !

हुगळी (बंगाल) – येथे भाजपकडून भ्रष्टाचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्च्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण करून कार्यकर्त्यांना मारहाण केली. लाठ्या-काठ्यांद्वारे हे आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याऐवजी भाजपच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक केली. या आक्रमणामागे तृणमूल काँग्रेसचे आमदार मुझुमदार यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे, हे भारतातील लोकशाहीवाद्यांना दिसत नाही का ? केंद्र सरकारने तात्काळ बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !