|
पीलीभीत (उत्तरप्रदेश) – येथील खपरैल क्षेत्रामध्ये असलेल्या अजीम नावाच्या व्यक्तीच्या घरातून तब्बल १ टन स्फोटके जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अजीम आणि त्याचा मुलगा तस्लीम या दोघांना अटक करण्यात आली. गेल्या मासात २ जुलै या दिवशी घरात ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन अजीमच्या तीन मुली मृत्यूमुखी पडल्या होत्या. तिघीही त्या वेळी नमाजपठण करत होत्या. यासह या स्फोटात त्याचे दुमजली घरही पडले होते. त्यासह शेजारील ११ घरांना तडे गेले होते. आता स्फोटके जप्त करण्याची कारवाई त्याच्या दुसर्या घरातून करण्यात आली.
नमाज पढ़ते दबकर मर गईं थी जिसकी 3 बेटियाँ, उसके घर से 10 क्विंटल विस्फोटक मिलाः पीलीभीत में अजीम बेग और उसका बेटा गिरफ्तार#UttarPradesh https://t.co/EVbPWzrMO6
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 5, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजीम हा अवैध पद्धतीने फटाके बनवण्याचे काम करतो. वस्ती असलेल्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यवसाय करणे अवैध आहे.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |