सौदी अरेबियात सापडले ८ सहस्र वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर !

रियाध (सौदी अरेबिया) – रियाधच्या दक्षिण-पश्‍चिम भागातील अल्-फॉ शहरात करण्यात आलेल्या उत्खननात ८ सहस्र वर्षांपूर्वीचे मंदिर सापडले आहे. या मंदिरावर अनेक प्रतीक चिन्हे आणि शिलालेखही आहेत. येथे यज्ञवेदीही सापडल्या आहेत. यावरून ‘येथे नियमित यज्ञ आणि अनुष्ठान करण्यात येत असावे’, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या मंदिराचे नाव ‘रॉक-कट मंदिर’ असे सांगितले जात आहे. येथे सापडलेल्या शिलालेखावर ‘कहल’ देवतेची माहिती असल्याचे सांगितले जात आहे. येथील लोक कोणत्या धर्माचे होती, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या मंदिराच्या जवळच कबरीही सापडल्या आहेत.