व्याकरणदृष्ट्या अयोग्य लिहिलेल्या शब्दांतून नकारात्मक स्पंदने, तर योग्य लिहिलेल्या शब्दांतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘संस्कृत खालोखाल मराठी सर्वांत सात्त्विक भाषा आहे. आपण प्रतिदिन बोलणे, लिहिणे, वाचणे इत्यादी कृती करतांना विविध शब्दांचा उपयोग करतो. शब्दांचा उच्चार योग्य किंवा अयोग्य केल्याने ते बोलतांना, ऐकतांना, लिहितांना किंवा वाचतांना मनाला काय जाणवते ?, याचा आपण कधी अभ्यास केला आहे का ? मराठीतून लिखाण करतांना शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे लिखाणात वेलांटी, उकार, रफार यांच्या ढोबळ चुका होतात.

‘व्याकरणदृष्ट्या शब्द योग्य किंवा अयोग्य लिहिल्याने त्यातून कशा प्रकारची स्पंदने प्रक्षेपित होतात ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीत ‘अकल्पित’, ‘कदाचित्’, ‘चिंतनवर्ग’, ‘धर्मक्रांती’, ‘मनुष्यजन्म’ आणि ‘ तथास्तु’ हे शब्द व्याकरणदृष्ट्या योग्य अन् अयोग्य पद्धतीने टंकलेखन करून त्यांच्या कोर्‍या कागदांवर प्रिंट काढण्यात आल्या. या सर्व प्रिंटच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

सौ. मधुरा कर्वे

१. व्याकरणदृष्ट्या अयोग्य लिहिलेल्या शब्दांतून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

व्याकरणदृष्ट्या अयोग्य लिहिलेल्या शब्दांमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा आढळून आली.

टीप – व्याकरणदृष्ट्या अयोग्य लिहिलेल्या शब्दांमध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा आढळून आली.

२. व्याकरणदृष्ट्या योग्य लिहिलेल्या शब्दांतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

व्याकरणदृष्ट्या योग्य लिहिलेल्या शब्दांमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सकारात्मक ऊर्जा आहे.

वरील सारण्यांतून लक्षात येते की, शब्द व्याकरणदृष्ट्या अयोग्य लिहिल्याने त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. शब्दांच्या चुका असलेले लिखाण वाचतांना मनाला त्रासदायक जाणवते. तसेच व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांवर काळे आवरण येते. याउलट शब्द व्याकरणदृष्ट्या योग्य लिहिल्याने त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. शब्दांच्या चुका नसलेले लिखाण वाचतांना मनाला चांगले वाटते. तसेच व्यक्तीला शब्दांतून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्मक स्पंदनांचा लाभ मिळतो. यातून ‘लिखाण करतांना ते व्याकरणदृष्ट्या योग्य असणे किती आवश्यक आहे’, हे लक्षात येते. मराठी भाषेतून मिळणार्‍या सात्त्विकतेचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी बोलतांना शब्दांचा उच्चार योग्य करावा, तसेच लिखाण करतांना शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.६.२०२२)

ई-मेल : [email protected]