तमिळनाडूतील पारपत्र घोटाळ्याच्या प्रकरणी मदुराईचे पोलीस आयुक्त निर्दाेष

मदुराई येथून ५४ पारपत्रे अवैधरित्या जारी केल्याचे प्रकरण

मदुराई (तमिळनाडू) – बनावट कागदपत्रांच्या आधारे श्रीलंकेतून आलेल्या नागरिकांना भारतीय पारपत्र दिल्याच्या प्रकरणी मदुराई शहराचे माजी पोलीस आयुक्त एस्. डेविडसन देवाशिरवथम् यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने निर्दाेष ठरवले आहे. या वेळी न्यायालयाने तमिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांचे हा घोटाळा उघड करण्यावरून कौतुक केले. ‘लोकशाहीचे सतर्क चौकीदार’ असे न्यायालयाने त्यांना म्हटले. या घोटाळ्यामध्ये क्षेत्रीय पारपत्र कार्यालय आणि राज्य पोलीस अधिकारी सहभागी आहेत. न्यायालयाने म्हटले की, हे निंदनीय आहे की, मदुराई शहरातील एका पोलीस ठाण्यातून फसवणूक करून ५४ पारपत्रे जारी करण्यात आली. अशांना तात्काळ अटक केली पाहिजे.