‘रामसेतू’ चित्रपटावरून डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली अभिनेते अक्षय कुमार यांच्या अटकेची मागणी !

अभिनेते अक्षय कुमार व भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी अभिनेते अक्षय कुमार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणार आहेत. ‘रामसेतू’ या आगामी हिंदी चित्रपटात रामसेतूचे सूत्र चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा डॉ. स्वामी यांनी केला आहे. ‘जर अक्षय कुमार विदेशी नागरिक असतील, तर आम्ही त्यांना अटक करून देशातून बाहेर काढण्यास सांगू शकतो’, असे डॉ. स्वामी यांनी ट्वीट करून म्हटले आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी या संदर्भात ट्वीट करून म्हटले आहे की, मी अभिनेते अक्षय कुमार आणि ‘कर्मा मीडिया’ यांच्या विरोधात त्यांच्या चित्रपटातील रामसेतू विषयीच्या चुकीच्या चित्रणामुळे झालेल्या हानीसाठी दावा प्रविष्ट करत आहे. माझे सहकारी अधिवक्ता सत्य सब्रवाल यांनी हानीभरपाईची प्रक्रिया अंतिम केले आहे.