पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण झाल्याने पुणे महापालिकेने ११ ठेकेदारांना नोटीस बजावली !

पुणे महापालिका

पुणे – ‘पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत असतील’, असा दावा पुणे महापालिका प्रशासनाने केला होता; मात्र एका पावसातच रस्त्यांना खड्डे पडून त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांच्या संदर्भात सर्वच स्तरांतून टीका होत असल्याने महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांना नोटीस बजावली. खड्डे पडण्यास पाणीपुरवठा आणि मलनिःसारण विभाग यांनाही उत्तरदायी धरले जाणार आहे. प्रशासनाने डी.एल्.पी. (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणजे दोषदायित्व कालावधीतील, म्हणजे रस्ते खराब झाल्यास ठेकेदार दुरुस्त करून देऊ शकतो, तो कालावधी) १३९ रस्त्यांपैकी ११ रस्त्यांच्या ठेकेदारांना नोटीस दिल्या. ११ पैकी ७ ठेकेदारांनी उत्तर दिले असून उर्वरित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.