-
इस्लामी देशांप्रमाणे आता राजस्थानमधील काँग्रेसच्या राज्यातही हिंदू असुरक्षित !
-
वस्तूस्थिती कळल्यावर शीख व्यक्तीला सोडून दिले !
अलवर (राजस्थान) – येथील मिलकपूर गावात ५ धर्मांधांनी गुरुबख्श सिंह नावाच्या शीख व्यक्तीला हिंदु पुजारी समजून घेरले. त्याची हत्या करण्याचीच त्यांची सिद्धता होती; मात्र गुरुबख्श सिंह हे शीख असल्याचे समजल्यावर त्यांनी त्याचे थोडेसे केस कापले आणि त्याच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून पळून गेले. या घटनेची माहिती गुरुबख्श सिंह यांनी पोलिसांना दिली. या घटनेनंतर संतप्त शिखांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक येथे पोचले आणि त्यांनी शिखांना शांत करून आरोपींना लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले.
Gurbaksh Singh was stopped & chili powder was thrown in his eyes by Jumma & group in Ramgarh, Alwar.
They had the plan to behead him but let him go after cutting his hair after knowing that he is a Sikh. pic.twitter.com/oOUwyz08t4
— Satyaagrah (@satyaagrahindia) July 22, 2022
संपादकीय भूमिका‘धर्मांधांनी हिंदूंविरूद्ध धर्मयुद्ध पुकारले आहे का ?’, असे सातत्याने घडणार्या अशा प्रकारच्या घटनांवरून वाटू लागले आहे. ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे ! |