रक्तपिपासू धर्मांधता गृहयुद्धाला निमंत्रण देणारीच !

नूपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचा बहाणा करत रक्तपिपासू धर्मांध कट्टरपंथियांनी सामान्यांचे गळे चिरून आणि गळे चिरण्याच्या धमक्या देऊन एका अर्थाने भारताच्या संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेलाच आव्हान दिले आहे. असे असतांनाही अनेक उत्तरदायी घटक या हत्यासत्रांना गांभीर्याने घेतांना दिसले नाहीत, ही अतिशय संतापजनक आणि चिंता वाढवणारी गोष्ट आहे. उदयपूरच्या कन्हैयालाल पाठोपाठ अमरावतीच्या औषधविक्रेत्याची हत्या झाली. धर्मांध मुसलमानांनी अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्याच्या कृत्याचे व्हिडिओ बनवले. ते संपूर्ण देशाने वृत्तवाहिन्यांवरून पाहिले. त्यानंतर धमक्यांचे चालू झालेले सत्रही वृत्तवाहिन्यांनी जाहीरपणे मांडले. आपल्याच देशातील मूठभर नागरिक दुसर्‍या मोठ्या समुहाला कसे दहशतीत ठेवू पहात आहेत, हे फाटलेल्या डोळ्यांनी संपूर्ण देश पहात राहिला. त्या उपरांतही त्या धर्मांध मुसलमानांना धडकी भरेल, अशी कोणतीही कृती शासकीय स्तरावरून घडलेली नाही. अटक सत्र आणि खटले काय परिणाम साधतात, हे लोकांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळेच तेवढ्याने समाधान न मानणार्‍या जनतेत मनस्वी चीड निर्माण झाली आहे.

१. अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी सरसावलेल्या कथित विचारवंतांनी हिंदूंच्या संरक्षणासाठी ‘ब्र’ही न काढणे

‘भारतात मुसलमान समुदाय सुरक्षित नाही’, अशी जागतिक स्तरावर हाकाटी पिटणार्‍या अमेरिकन सर्वेक्षण संस्थांना भारतातील ही गळेकापू जमात दिसणार नाही, यात काही शंकाच नाही. ‘हिंदूंचा सरसकट निर्घृण संहार झाला’, हे सत्य नाकारणारे तथाकथित विचारवंत आता ‘गळेकापूंनाही दोषी मानायला सिद्ध नाहीत’, हा त्याहून भयानक एकांगीपणा आहे. यांचा हा कोणता सर्वधर्मसमभाव आहे, हे अनेकांना उमजलेले नाही. ‘१०० माराव्या आणि एक मोजावी’, या लायकीचे असले कथित विचारवंत गावागावांत सतराशे साठ आढळतात. ‘धर्मांध प्रवृत्तींपासून हिंदूंना संरक्षण द्या’, असे म्हणायला यांच्यापैकी एकही जण धजलेला नाही. जवळपास ते सर्वच जन्माने हिंदु आहेत, ही त्याहून लज्जास्पद गोष्ट ! मतांच्या स्वार्थापायी फक्त एकाच विशिष्ट समुहाची काळजी वाहून त्यांच्या अवगुणांना सातत्याने झाकत आले आहेत, हे आता जनतेला कळले आहे.

२. विशिष्ट समुहाला चिथावणी देणारे मौलवी गळे चिरण्याच्या घटनांना उत्तरदायी असल्याचे न दिसणे, हे आश्चर्यजनक !

‘नूपुर शर्मा यांचे विधानच गळे चिरण्याच्या घटनांना उत्तरदायी आहे, ही सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केलेली टिपणी तर याची परिसीमा ठरली’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ? ‘भारतावर आक्रमण करायला आलेल्या महंमद शाह अब्दालीच्या किंवा गझनीच्या थाटात ज्या मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) आणि नेते यांनी भारतातील विशिष्ट समुहाला चिथावणी देत धर्मांधता पेटवली, ते मौलवी गळे चिरण्याच्या घटनांना उत्तरदायी असल्याचे या कुणाला का दिसले नाहीत ?’, हा देशातील जनतेला पडलेला खरा प्रश्न आहे. एक बरे झाले की, १५ निवृत्त न्यायाधीश, ७७ निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि २५ निवृत्त सैन्याधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे लोकांच्या याच भावना सर्वाेच्च न्यायालयाकडे पत्राद्वारे मांडल्या आहेत. हिंदु समुहाला दुर्लक्षित करून कायम त्यांच्या भावनांना हीन लेखणार्‍या एकांगी विचारसरणीला देशपातळीवरच्या इतक्या बुद्धीवंतांनी एकत्रित प्रत्युत्तर द्यावे, हे बहुधा प्रथमच घडले असावे.

३. कट्टरपंथियांना कोणताही मुखवटा नाही, हे वास्तव स्वीकारणे आवश्यक !

अमरावतीच्या घटनेतील संदर्भ धक्कादायक आहेत. हिंदु औषधविक्रेता धर्मभेद न पाळता एकतेच्या खर्‍या भावनेतून पदोपदी उपयोगी पडलेला होता. असे असतांनाही केवळ नूपुर शर्मा यांचे समर्थन केले; म्हणून त्याच्या मुसलमान मित्राने क्रौर्यतेने गळा चिरला, ही गोष्ट प्रत्येकाच्या मनाचा थरकाप उडवून गेली. ती हत्या मानवतेला काळीमा फासणारी आहे. ‘धार्मिक सलोख्यावरची अंधश्रद्धा किती पाळायची ? याचेही भान देणारी ही घटना आहे’, असे नाईलाजाने म्हणावे लागते; कारण एक प्रकारे धार्मिक सलोख्याचा गळा कापणार्‍या प्रवृत्तींवरच त्या घटनेने प्रकाश पाडला आहे. ते सगळे लोक सरसकट तसे नसले, तरी कट्टरपंथियांना कोणताही मुखवटा नाही, हे वास्तव या घटनांनी पुन्हा अधोरेखित केले आहे.

४. रक्तपिपासू धर्मांधतेची नवीन आवृत्ती बनून समोर येणे

गावातील गल्लीबोळात म्हणा किंवा प्रतिदिन जीवनात भेटणार्‍या इसमाच्या रूपात म्हणा, धर्मांध आपल्या भोवताली असू शकतात. तसेही त्यांची अनेक रूपे आधीपासून नांदत आहेत. कालपर्यंत लव्ह जिहादच्या रूपाने, हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्षेप घेत दगडफेक करणार्‍यांच्या रूपाने ते पहायला मिळत होते. आज रक्तपिपासू धर्मांधतेची नवीन आवृत्ती बनून समोर आली आहे, एवढाच काय तो भेद ! देश आणि राज्य स्तरांच्या शासकीय यंत्रणांना ती धर्मांधता कधीही संपवता आलेली नाही, मग नाहक आमचेच रक्त सांडून त्याची किंमत सातत्याने आम्हीच का मोजावी ? हा प्रश्न आता काही लोक करू लागले आहेत.

५. भारतातील हिंदु रक्तपिपासू धर्मांधतेसह सुरक्षित कसा राहू शकेल ?

आपल्या धर्मभावना दुखावणार्‍या आणि अपमानित करणार्‍या विचारसरणीविषयी खुलेपणाने काही मते मांडली; म्हणून थेट गळे चिरणार्‍या रक्तपिपासू धर्मांधतेसमवेत येथून पुढे भारतातील हिंदु सुरक्षित कसा राहू शकेल ? हा प्रश्नही भविष्यात उपस्थित होऊ शकतो. लोकांमधून उमटणार्‍या चिंता याच अर्थाच्या आहेत. आज जे घडते आहे, तसेच ते पुढे चालू राहिले, तर मग ही भावना वाढीस लागणे अटळ आहे आणि यातूनच एक दिवस गृहयुद्ध पेटण्याचा धोका उद्भवेल. प्रतिदिन वृत्तवाहिन्यांवर पहायला आणि ऐकायला मिळणारी राष्ट्रद्रोही विधाने अन् हिंदुद्वेषी विखारी भाषणे उघडपणे भारतियांच्या विरोधात विशिष्ट समुहाला पेटवतांना दिसत आहेत. त्यामुळे दुसरे काय घडणार ? त्या धर्मांध प्रवृत्ती ठेचून संपवण्याऐवजी धर्मसलोखा लादून हिंदूंना नंपुसक बनवण्यात धन्यता मानणारी सगळी यंत्रणा भविष्यात त्या कारणाने उद्भवणार्‍या परिस्थितीला कारणीभूत राहील, हे आताच लक्षात घ्यायला हवे.

६. धर्मांधांमध्ये क्रौर्य निर्माण करणार्‍या प्रवृत्तींना ठेचण्याचा कार्यक्रम पोलीस यंत्रणांना हाती घ्यावासा वाटेल तो सुदिन !

राज्यघटनेतील कायदे हिंदु समूह आणि हक्क यांचे संरक्षण करायला पूर्णपणे सक्षम नसल्याचा अनुभव अनेक वर्षांपासून येत आहे. त्याची शेकडो उदाहरणे असून लोकांच्या मनात त्यावरचा संताप दाटलेला आहे; कारण जनतेला प्रकर्षाने अनुभवास येते की, हिंदुत्वाचे संरक्षण, भावना, सन्मान, अस्मिता आणि श्रद्धा यांचा प्रश्न उपस्थित करणारे काहीही घडो, त्या त्या प्रसंगात हिंदुत्वाला किंवा हिंदुप्रेमींनाच दडपायचे, हे पूर्वापार चालत आले आहे. धर्मांध प्रवृत्तींना ठेचण्याऐवजी हिंदुप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना चेपण्यात कायदा-सुव्यवस्थेची सुरक्षा शोधली जाते. चुकीच्या आणि बिभत्स पद्धतीने हिंदु धर्म, प्रथा अन् देवीदेवता यांची चिकित्सा मांडणार्‍यांना योग्य ठरवले जाते. ही गल्लत सरकारी यंत्रणा वर्षानुवर्षे करत आली आहे. सरकारी यंत्रणांचे असले दूषित दृष्टीकोन पालटले जाणार नसतील, तर पुढे हे गळेकापू आणि त्यांच्याशी टक्कर घेऊ पहाणारे असेच वाढत जाणार का ? हा प्रश्न आपोआपच पुढे येतो. त्यामुळे पोलीस यंत्रणांना ‘प्रत्येक जिल्ह्यात शोधमोहीम राबवून धर्मांधांमध्ये क्रौर्य निर्माण करणार्‍या प्रवृत्तींना ठेचणे’, हा एककलमी कार्यक्रम हाती घ्यावासा वाटेल, तो सुदिन म्हटला जाईल !

– श्री. योगेंद्र प्रभाकर जोशी, नंदुरबार. (६.७.२०२२)

संपादकीय भूमिका

देशातील बहुसंख्यांक हिंदू धर्मांधांपासून सुरक्षित रहाण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक !