१. ‘एक कप चहा समवेत गोमूत्र सेवन करावे. गोमूत्राला अष्टपदरी कापडातून गाळून घ्यायला पाहिजे आणि हळूहळू सवयीने त्याचे प्रमाण वाढवून पाव ते दीड पाव (पाऊण) कपापर्यंत करू शकतो. थोडेसे गोमूत्र उन्हात ठेवून दुसर्या दिवशी ते शरिरावर लावून चोळण्यामुळे विविध रोगांपासून सुटका मिळते.
२. देशी गायीचे मूत्र गुणकारी असते. बालकांच्या बाळगुटीमध्ये जर गोमूत्राचे काही थेंब मिसळून पाजले, तर बाळाला अनेक रोगांपासून विशेषतः पोटाच्या विकारापासून मुक्ती मिळते.
३. नियमित गोमूत्राचे सेवन केल्यावर रक्तदाब सर्वसाधारण होतो.
४. गोमूत्र पोटाचे सर्व विकार आणि यकृताचे आजार यांना दूर करून शरिरात स्फूर्ती निर्माण करते.
५. गोमूत्र सकाळी रिकाम्या पोटी सेवन करावे आणि त्यानंतर एक घंटा काही खाऊ नये.
(साभार : मासिक ‘कल्याण’, भाग ९५)