पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आषाढी वारीच्या निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या नागपूर जिल्ह्यातील २ भाविकांचा चंद्रभागा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. सचिन कुंभारे आणि विजय सिद्धार्थ सरदार अशी मृत युवकांची नावे आहेत. सचिन कुंभारे याला नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी विजयने पाण्यात उडी घेतली; मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.