जिहाद्यांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी विहिंपकडून ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित !

  • पश्‍चिम महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांतील हिंदूंना ८७६६५२५८५७ या ‘हेल्पलाईन’ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !

  • जिहाद्यांपासून धोका असलेल्या हिंदूंना संपर्क साधून साहाय्य मागता येणार !

पुणे – धर्मांध आणि देशद्रोही शक्ती यांच्याकडून बहुसंख्य हिंदु समाजाच्या व्यापारी वर्गावर दगडफेक, तसेच त्यांच्या दुकानांची तोडफोड केली जात आहे. जिहाद्यांकडून हिंदूंच्या हत्या, धार्मिक उन्मादातून हिंदूंवर प्राणघातक आक्रमणे, चिथावणीखोर भाषणे, बहिणी-मुली यांच्या संदर्भात लव्ह जिहाद, तसेच लॅण्ड जिहाद या हिंदूंना धोक्यात आणणार्‍या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे हिंदु समाजाच्या रक्षणासाठी विश्‍व हिंदु परिषदेच्या ‘युवा शक्ती बजरंग दला’च्या वतीने ८७६६५२५८५७ हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित करण्यात आला आहे. युवा शक्ती बजरंग दलाकडून हिंदु समाजाच्या साहाय्यासाठी हा क्रमांक पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, तसेच नाशिक या ७ जिल्ह्यांसाठी आहे, असे विहिंपने म्हटले आहे.

विहिंपचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार-प्रसार प्रमुख श्री. विवेक सोनक म्हणाले की, भारताची अखंडता, सहिष्णुता आणि सार्वभौमत्व यांवर घाला घालण्याच्या प्रयत्न होत आहे. हिंदु देवता, धार्मिक श्रद्धा यांचा अपप्रचार केला जात आहे. कोणत्याही देशद्रोही घटकाने हिंदूंना कोणत्याही प्रकारे धमकावले किंवा आक्रमण केले, तर हिंदूंनी त्वरित स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांना कळवावे अन् त्यांच्याकडे तक्रार करावी. जर पोलीस कारवाई करत नसतील, तर ‘हेल्पलाईन’द्वारे आमच्याशी संपर्क साधावा.

संपादकीय भूमिका

जिहाद्यांना पोलिसांचा धाक वाटत नसल्याने आता हिंदूंच्या साहाय्यासाठी हिंदु संघटनांना पुढाकार घ्यावा लागत आहे, हे पोलिसांना लज्जास्पद !