(म्हणे) ‘जिथे मला माझ्या धर्माविषयी बोलण्याचेही स्वातंत्र्य नाही, अशा भारतात मला रहायचे नाही !’

श्री महाकालीदेवीविषयी केलेले आक्षेपार्ह विधानानंतर गुन्हे नोंद होऊ लागल्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा थयथयाट !  

डावीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

कोलकाता (बंगाल) – तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ‘काली’ माहितीपटाच्या वादग्रस्त भित्तीपत्रकाचे समर्थन करतांना ‘श्री महाकालीदेवीला मांस आणि मद्य अर्पण केले जाते’, या केलेल्या विधानावरून त्यांच्यावर देशभरातून टीका होऊ लागली आहे. उत्तरप्रदेश, कोलकाता आणि भोपाळ यांसह अनेक ठिकाणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तृणमूल काँग्रेसने त्यांच्या विधानपासून स्वतःला दूर ठेवले आहे. या टीकेनंतर महुआ मोईत्रा यांनी ट्वीट करून ‘मला अशा भारतात रहायचे नाही, जिथे मला माझ्या धर्माविषयी बोलण्याचेही स्वातंत्र्य नाही. मला अशा भारतात रहायचे नाही जिथे केवळ भाजपचा पितृसत्ताक ब्राह्मणवादी दृष्टीनो वरचढ असेल. मी मरेपर्यंत माझ्या विधानापासून मागे हटणार नाही. तुम्ही गुन्हे नोंदवा. मी देशाच्या प्रत्येक न्यायालयात तुम्हाला भेटीन’, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

मोईत्रा यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना आता कारागृहात जाऊन शिक्षा भोगावी लागणार असल्याने त्या आता अशी विधाने करत आहेत. त्यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखले पाहिजे आणि तात्काळ अटक केली पाहिजे !