नवी देहली – १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तसेच ५ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली असून व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
राजधानी देहलीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १ सहस्र ५३ रुपये, तर १९ किलोच्या सिलिंडरची किंमत २ सहस्र ३० रुपये झाली आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर आता १ सहस्र ५२ रुपये ५० पैशांनी मिळेल, तर १९ किलोच्या सिलिंडरसाठी १ सहस्र ९९० रुपये मोजावे लागणार आहेत.
Domestic LPG cylinder: Price of 14.2 kg cylinder gets dearer by Rs 50 https://t.co/7hkaArWZpi pic.twitter.com/DDpfp1Zdes
— Economic Times (@EconomicTimes) July 6, 2022
वर्षभरात घरगुती सिलिंडर सरासरी २१८.५० रुपयांनी महागला !
देहलीत गेल्या एका वर्षात घरगुती सिलिंडरची किंमत ८३४.५० रुपयांवरून आता १ सहस्र ५३ रुपयांवर पोचली आहे. सर्व महानगरांमध्ये साधारण अशा प्रकारचीच वाढ झाली आहे. वर्षभरात घरगुती सिलिंडर सरासरी २१८.५० रुपयांनी महागला आहे.