कल्याण येथे साचलेल्या पाण्याचा ४०० कुटुंबियांना फटका !

दरड कोसळली

कल्याण येथे साचलेल्या पाण्याचा ४०० कुटुंबियांना फटका बसला

कल्याण – दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने कल्याण पूर्व भागात पत्रीपुलाजवळ डोंगरावरील हनुमाननगर भागात दरड कोसळली. तेथील घरे दरडीपासून काही अंतरावर असल्याने सुदैवाने जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. पूर्व भागातील अडिवली-ढोकळी भागांत अनेक वर्षांपासून पालिकेकडून नाल्याचे काम केले जात नसल्याने या भागात पाणी साचून ४०० कुटुंबियांना त्याचा फटका बसला. घरात शिरलेले पुराचे पाणी रहिवासी रात्रभर काढत होते. (वेळीच नालेस्वच्छता न केल्याचा हा परिणाम आहे, हे प्रशासनाने लक्षात घ्यावे ! – संपादक)