उदयपूर हत्याकांडात २ मौलवी आणि २ अधिवक्ते यांचाही सहभाग !

(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)

जयपूर – उदयपूरमधील कन्हैयालाल हत्या प्रकरणाच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. उदयपूरच्या रियासत हुसेन आणि अब्दुल रज्जाक या दोन मौलवींनी हत्येतील आरोपी महंमद गौस याला ‘दावत-ए-इस्लामी’च्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला पाठवले होते. गौस याच्यासमवेत मुख्य आरोपी रियाझ अत्तारी, तसेच अख्तर रझा हेसुद्धा पाकिस्तानला गेले होते. या पाचही जणांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कह्यात घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अधिवक्तेही या कटात सहभागी आहेत. त्यांनाही कह्यात घेण्यात आले आहे.

हत्या घडवून आणण्यासाठी झाली होती बैठक !

आरोपींची एक बैठक झाली होती, ज्यामध्ये रियाझ अत्तारी याने कन्हैयालाल यांच्या हत्येचे दायित्व घेतले होते. या बैठकीला रियाझ याच्यासह महंमद गौस, आसिफ आणि मोहसीन उपस्थित होते. कन्हैयालाल यांच्या दुकानापासून काही अंतरावर असलेल्या मोहसीनच्या दुकानात आणि शेजारीच असलेल्या आसिफच्या खोलीत हत्येचा कट रचला गेला. राजस्थानच्या आतंकवाद विरोधी पथकाने मोहसीन आणि आसिफ यांनाही अटक केली आहे. हत्येच्या नियोजनापासून ते शस्त्रे बनवण्याच्या कटात आसिफ आणि मोहसीन या दोघांचा सहभाग होता. ज्या गल्लीत कन्हैयालाल यांचे दुकान होते, त्या गल्लीत रियाझ आणि महंमद गौस यांचे येणे-जाणे आधीपासूनच असल्याने त्यांना या परिसराची चांगली माहिती होती.

संपादकीय भूमिका

  • ‘आतंकवादाला धर्म नसतो’ असा कंठशोष करणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ?
  • दोन मौलवींवरही हत्येचा ठपका ठेवण्यात येणे, यातून मदरसा अन् मशिदी यांमध्ये कशाचे शिक्षण दिले जाते, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कुणी केल्यास चुकीचे काय ?
  • जिहादी कारवायांत उच्च विद्याविभूषित अधिवक्त्यांचा सहभागी पहता ‘मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणल्यासच गुन्हेगारीतील त्यांचे वाढते प्रमाण न्यून होऊ शकते’, असा युक्तीवाद करणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ?