एस्. एस्. आर. एफ्.‘लाइव्ह चॅट’द्वारे एस्. एस्. आर. एफ्..च्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

लाइव्ह चॅट म्हणजे लवकरात लवकर प्रश्नाचे उत्तर देण्याची सुविधा

१. एस्. एस्. आर. एफ्. चे संकेतस्थळ, म्हणजे अंधाऱ्या मार्गावरील दीपस्तंभच !

‘एस्. एस्. आर. एफ्. चे साधक चांगले कार्य करत आहेत. ईश्वराची तुमच्यावर सदैव कृपा राहो. एस्. एस्. आर. एफ्. चे संकेतस्थळ, म्हणजे अंधाऱ्या मार्गावरील दीपस्तंभच आहे. तुमच्याकडे अध्यात्मावर आधारित संशोधन करणारे संशोधन केंद्र आहे, हे पाहून मला देवाप्रती कृतज्ञता वाटते.’ – एक जिज्ञासू, भारत

२. ‘लाइव्ह चॅट’वर तुमच्याशी बोलतांना मला निरपेक्ष राहून प्रार्थना करण्याचे महत्त्व समजले !

‘मी माझ्या संपूर्ण आयुष्यात देवाकडे चुकीच्या (म्हणजे अपेक्षा ठेवून) प्रार्थना करत होते. त्या प्रार्थना करण्यामागे नेहमीच माझा काहीतरी हेतू असायचा. मी नेहमी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी, माझे रक्षण होण्यासाठी आणि ऐक्य निर्माण होण्यासाठी प्रार्थना करत होते; मात्र यांतील काहीच साध्य होत नव्हते. ‘लाइव्ह चॅट’वर मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद !’ – एक जिज्ञासू, माँटेनिग्रो

३. एस्. एस्. आर. एफ्. मध्ये साधनेविषयीच्या शंकांचे निरसन त्वरित केले जाते !

‘तुम्ही सांगितलेल्या नामजपाने मला साहाय्य झाले. ‘एस्. एस्. आर. एफ्. च्या साधकांशी मनमोकळेपणाने बोलू शकतो’, हे पाहून मला चांगले वाटले. ‘येथे साधनेविषयीच्या शंकांचे निरसन त्वरित केले जाते, तसेच मनातील प्रश्नांवर केवळ तात्त्विक स्तरावर नाही, तर प्रायोगिक स्तरावर उपाययोजना सांगितली जाते’, याबद्दल तुमचे आभार !’ – एक जिज्ञासू, दक्षिण आफ्रिका

४. एस्. एस्. आर. एफ्. मुळे माझ्या आयुष्यात सकारात्मक पालट झाले आहेत !

‘मी एस्. एस्. आर. एफ्. प्रती कृतज्ञ आहे. मी एस्. एस्. आर. एफ्. च्या संकेतस्थळावरील लेख नियमित वाचते. या लेखांत मानवाला ‘अध्यात्मात योग्य दिशेने मार्गक्रमण कसे करावे ?’, याचा उत्तम मार्ग दाखवला आहे. तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात सकारात्मक पालट झाले आहेत. ‘तुम्ही करत असलेल्या मार्गदर्शनाचा लोकांनी लाभ घ्यावा’, असे मला वाटते.’ – एक जिज्ञासू, भारत

(सर्व सूत्रांचा मास : मार्च २०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक