नवी देहली – अनुमती न घेता सुट्टीवर जाणार्या सरकारी कर्मचार्यांना दंड ठोठावावा, असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी म्हटले.
Harsh to fire govt staffer over unauthorised offs: Supreme Court https://t.co/SC00neC2r7
— The Times Of India (@timesofindia) July 1, 2022
१. वर्ष २००० मध्ये खाण मंत्रालयात कार्यरत असलेला एक अधिकारी १०० दिवसांपेक्षा अधिक काळ सुट्टीवर गेला होता. सुट्टीवर जाण्यापूर्वी अनुमती न घेतल्यामुळे त्याला कामावरून बडतर्फ करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने सरकारचा आदेश कायम ठेवला होता.
२. सर्वोच्च न्यायालयाने मात्र हा आदेश रहित करत अधिकार्याला निवृत्तीवेतनाच्या लाभांसह सक्तीची निवृत्ती घेण्याचे निर्देश दिले.