(म्हणे) ‘कन्हैयालाल यांच्या हत्येमागे पाकचा हात असल्याचा दावा, हा पाकची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !’  

पाकचा भारतावर आरोप

इस्लामाबाद (पाकिस्तान) – कन्हैयालाल यांच्या हत्येमागे पाकच्या कराची येथील ‘दावत-ए-इस्लामी’ या संघटनेचा हात असल्याचा दावा पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला. ‘हा दावा, म्हणजे भारताकडून पाकची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न आहे. याद्वारे भारतातील अंतर्गत प्रश्‍नांवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. याद्वारे लोकांची दिशाभूल करण्याचा भारताचा प्रयत्न यशस्वी होणार नाही’, असे पाकने म्हटले आहे. राजस्थानचे पोलीस महासंचालक एम्.एल्. लाठर यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येत ‘दावत-ए-इस्लामी’ संघटनेचा हात असल्याचा दावा केले होता.

संपादकीय भूमिका

  • पाक जगाच्या नकाशावर जिहादी आतंकवादासाठी कुप्रसिद्ध असल्याने पाकची अपकीर्ती होण्यासारखे काहीही शेष नाही, हे त्याने कायमचे लक्षात ठेवायला हवे !
  • भारतातील प्रत्येक जिहादी आक्रमणामागे कोणत्या ना कोणत्या रूपाने पाकिस्तानचा हात असल्याने त्याला नष्ट केल्याविना भारतातील जिहाद नष्ट होणार नाही, हे सरकारने लक्षात घ्यावे !